
दैनिक चालु वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी-मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील अनेक पाड्यावर गोर गरीब लोकांच्या वस्त्या आहेत ज्यांना अन्न वस्त्र निवारा साठी लागणाऱ्या गोष्टींसाठी मोठ्या जीवाचे रान करून मिळतं अश्या लोकांची माहिती घेऊन वसई सामाजिक संस्था व जन ग्रामीण सेवा संस्थेच्या वतीने (२९ जून ते १जुलै) रोजी वाडा तालुक्यातील पेठरांजणी, पिक,आबिसते पिंपळास,सोनशिव, या पाच गावांतील पाड्यावर गोर गरीब लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे तालुका संघटक लहू बसवंत तालुका कमिटीच्या चे अध्यक्ष दयानंद हारल तालुका सचिव नितीन तरे तालुका उपसचिव मुकेश वाकडे तसेच वाडा शहर कमिटी चे प्रकाश हारळ , पंडित हारळ यांच्या उपस्थितीत व हस्ते कपडे वाटप करण्यात आले.