
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी -प्रा .मिलिंद खरात
सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य सत्कार व स्नेहभोजन सोहळ्याचे आयोजन 1 जुलै 2022 रोजी रात्री 8 वाजता हाॅटेल सवाई मल्हार,जुना आग्रारोड,वासिंद पश्चिम येथे करण्यात आले.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोक गायकवाड सर व संचालक कैलास खैरनार सर यांचा वाढदिवस केक कापून, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानपूर्वक व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच अध्यक्ष “अशोक गायकवाड सर” यांना भारतज्योती MVLA राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिध्दार्थ फाऊंडेशनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेचे माजी अध्यक्ष वसंत धनगर सर यांना महाराष्ट्र पत्रकार संघ संलग्न मुंबईचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे खजिनदार “डाॅ. होमराज शेंडे” सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सहसचिव “संजीव जाधव सर” यांची तीन वेळा सरस्वती विद्यालय सेवकवर्ग पतसंस्था वासिंद बिनविरोध निवड व चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे-पालघर जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढी संचालक पदावर निवडून आलेले ठाजिप.चे कनिष्ठ लेखापाल माधवजी भोईर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आला. तसेच ॲडव्होकेट विनोद भोईर यांची वकिल असोशिएशन बार कॉन्सिलवर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला
या वेळी संस्थेचे माजी अध्यक्ष वसंत धनगर सर, सहसचिव संजीव जाधव सर, संचालक सिद्धार्थ साळवे, जिल्हापरिषद कर्मचारी पतपेढी संचालक माधव भोईर साहेब, ॲडव्होकेट विनोद भोईर साहेब यांनी सत्कारमूर्ती च्या शैक्षणिक सामाजिक कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या तसेच अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढून,शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस जगदिश गायकवाड सर यांनी बहारदार शैलीत केले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष वसंत धनगर सर, अध्यक्ष अशोक गायकवाड सर, सरचिटणीस जगदिश गायकवाड सर, कोषाध्यक्ष डाॅ.होमराज शेंडे,उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, सहसचिव संजीव जाधव सर, संचालक मच्छिंद्र साळवे,महादेव वाढविंदे,कैलास खैरनार,सिद्धार्थ साळवे ,संदीप गायकवाड, ठाणे जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढीचे संचालक माधव भोईर, ॲड. विनोद भोईर ,चिरंजीव सम्यक वसंत धनगर,ई. उपस्थित होते.