
दैनिक चालु वार्ता शिरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचं नुकतचं शुक्रवारी दि. 1 जुलै रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले ही वार्ता राज्यभर पसरली. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी दि. 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी भरणेवाडी येथे दाखल होत भरणे कुटुंबाची भेट घेत भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. गिरीजाबाई उर्फ जिंजीच्या विठोबा भरणे यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी फलटणचे आमदार दिपक चव्हाण उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह भरणे कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देशाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणि दत्तात्रय भरणे ही चारही भावंडं व भरणे परिवार उपस्थित होता.