
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
उदयगिरी मल्टीस्पेशालिटी ॲण्ड ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे संस्थापक संचालक तथा प्रसिध्द लॕप्रोस्कोपीक व एन्डोस्कोपीक सर्जनतज्ञ डॉ. माधव वीरप्पा चंबुले, प्रसिद्ध ह्दयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. रमण व्हि. रेड्डी, कंन्सल्टिंग रेडीओलॉजिस्ट तज्ञ डॉ.सौ.रेखा रमण रेड्डी, आॕर्थोपेडिक सर्जनतज्ञ डॉ. श्रीनिवास एम.बलशेटवार, पॕथाॕलॉजिस्ट डॉ.नारायण जी.देशमुख, ह्दयरोग व मधुमेह तज्ञ डॉ.लक्ष्मण ए.ढोकाडे, ॲनेस्थेशिया डॉ.निलेश एन.जगताप, साई हॉस्पिटल व साई डेंन्टल केअर ॲण्ड इंम्प्लॉट सेंटरचे प्रसिद्ध मुख व दंत चिकीत्सक तज्ञ डॉ. सुशील चंबुले, गीता ई.एन.टी.हॉस्पिटलचे संचालक तथा प्रसिध्द कान, नाक, घसातज्ञ तथा प्रसिद्ध कवी, लेखक डॉ.संजय शेषेराव कुलकर्णी, गुरूडे कंन्सल्टिंग रेडिओलॉजिस्टचे प्रसिद्ध कंन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट संचालक तथा तज्ञ डॉ. नीतीन नारायण गुरूडे, नारायण गुरूडे सर, माहेर मॕटर्निटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटरच्या संचालिका व प्रसिद्ध स्ञी रोगतज्ञ डॉ. प्राजक्ता नीतीन गुडे-गुरूडे, अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैधकिय अधिकारी डॉ.माधवी सतीष जाधव, जीवनदीप हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध तज्ञ डॉ. सतीष संभाजीराव जाधव, शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी शिवा थोटे नळगीरकर यांच्या सह शहरातील व उदगीर मतदारसंघातील विविध डॉक्टरर्स यांच्या समाजाप्रती अंगी असलेली सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती असलेली अस्था व समाजसेवावृत्तीची दखल घेत अतनुरातील लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस, आॕल इंडिया मराठा आॕरगान्सेस संघटना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा उदगीर, भारतीय मजदूर संघटना, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर यांच्या संयुक्त विधेमाने (दि.१)जुलै डॉक्टरर्स डे दिनानिमित्त सेवाभावी संस्थेच्या वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनानिमित्त, व डॉक्टर डे दिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक साईड रस्त्याने व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, भारतीय मजदूर संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष बालासाहेब शिंदे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, पत्रकार रोशन मुल्ला, पत्रकार संजय शिंदे, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी प्रविण सोमवंशी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी तथा सेवानिवृत्त भुमी अभिलेख भूमापक पी.एच.सोमवंशी, शिवसेनेचे जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, शिवसेना व युवासेनेचे जळकोट तालुकासमन्वयक मुक्तेश्वर येवरे-पाटील, कामगार काँग्रेसचे जळकोट तालुकाअध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, मराठा संघटनेचे अविनाश शिंदे, भारतीय मजदूर संघटनेचे प्रतिनिधी हणमंत साळुंके उपस्थित होते.