
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
श्री. विनायक दौलतराव गायकवाड, पोलीस निरीक्षक सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार- अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
गुन्हे शाखांतर्गत पथकांकडुन माहे मे २०२२ मध्ये करण्यात आलेल्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट आहे.. आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांना माहे मे – २०२२ चा “पथक ऑफ द मंथ पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मनस्वी अभिनंदन….
या पुढील काळातही आपण तसेच आपल्या पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी इतक्याच कार्यतत्परतेने आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडून पोलीस व गुन्हे शाखेविषयी शहरातील नागरीकांचा विश्वास संपादन करावा, अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.
आपल्या सारखे तत्पर व कार्यक्षम अधिकारी आणि अंमलदार पुणे शहर पोलीस दलातील
गुन्हे शाखेत कार्यरत असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
शुभेच्छासह…..