
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेली नीट परीक्षा ही १७ जुलै रोजी होणार आहे. अशावेळी नीट-२०२२ देणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रा. मोटेगावकर सरांच्या फउउ च्या वतीने आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात गतवर्षीच्या नीट-२०२१ मध्ये उज्ज्वल यश मिळवून देशातील नामवंत मेडिकल कॉलेज असलेल्या एआयआयएमएस आणि एमएएमसी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे नीट-२०२२ देणा-या नांदेड आणि लातूर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
गतवर्षीच्या नीट परीक्षेत मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले होते. ‘आरसीसी’ च्या तब्बल १५५७ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी देशभरातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यामध्ये २२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्वाच्या असलेल्या देशातील विविध महत्वाच्या शहरातील एआयआयएमएस आणि दिल्ली येथील एमएएमसी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, आगामी नीट-२०२२ परीक्षा ही १७ जुलै रोजी होणार आहे, तरी परीक्षा देणा-या भावी डॉक्टरांना ‘आरसीसी’ चे विद्यार्थी आणि एआयआयएमएस आणि एमएएमसी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले अनिरुद्ध डाखरे, श्रेया आरु आणि अथर्व वट्टमवार, रोहन घुगे हे नीट-२०२२ देणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उपक्रम आज दि. ३ जुलै लातूर येथील मधुमीरा फंक्शन हॉल येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात नीट संदर्भात मार्गदर्शन करताना आपला परीक्षेसंदर्भात असलेला अनुभव सांगत पेपर सोडविण्याची पद्धत, परीक्षेतील तीन तासांचा अनुभव आणि आहार, वेळ आणि अभ्यासाचे नियोजन या मुद्दांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत त्यादिशेने वाटचाल करत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच गुरुबंधुकडून मार्गदर्शन लाभणार असल्यामुळे नांदेड आणि लातूर येथे आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘आरसीसी’ व्यवस्थापनाने कळविले आहे.