
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- अरुण भोई
जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाडी राजेगाव यांच्या वतीने शुक्रवारी(दि. १) ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची
माहिती व्हावी व आपली सांस्कृतिक परंपरा जोपासली जावी, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन केले होते.
ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. या वेळी राजेगावातील उपस्थित होते
सर्व भजन मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे ,सतीश हाके,सर प्रशांत वाघमोडे,सर दिलीप शिर्के,सर शिक्षिका योगिता कचरे,वैशाली शिंदे,या शिक्षकवृंद ने राजेगाव मध्ये लोकांना पांडुरंगाच्या वारीचे दर्शन घडविले