
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-महाराष्ट्र शासन प्रगती पथाकडे नेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून वाढत्या महागाई नुसार रमाई आवास योजनेचा निधी हा अपुरा होत असून या मध्ये घराचे काम पूर्ण होत नाही . सध्या विटांचे दर हे गगनाला भिडले असून १०००विटांची किंमत ८०००रु असून घर बांधण्यासाठी १० ते १२ हजार विटा लागत आहेत . यातच सिमेंट एक पोते ३०० ते ४०० रुपयाच्या दरम्यान आहे. यातच वाळूचा पूरवठा होत नसल्याने बांधकामाचे डस्ट हे ६००० रुपये एवढ्या चढ्या भावाने घ्यावे लागत आहे . सळई ही शंभरी च्या जवळ गेली आहे . आणखीन बांधकाम करणारे गवंडी यांची ही मजुरी ५०००० ते ६००००हजार रुपये होत आहे .
यामुळे बरेच महिने झाले तरी घरकुलाची कामे ही अर्धवट राहिलेली आहेत .
यामुळे लाभधारकाला बचत गट , बँकेचे कर्ज घ्यावे लागत आहे . काही लाभधारक व्याजाने ही पैसे घेत आहेत . यामुळे लाभधारक कर्जबाजारी होत चालला आहे . यामुळे शासनाने रमाई आवास सह सर्व घरकुल योजनेचा निधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी घरकुल लाभधारकाकडून होत आहे .
स्टेटमेंट
लाभधारकाला एक लाख वीस हजार रु व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून आठरा ते एकविस हजार रु एवढा निधी देण्यात येत आहे
भागवत ढवळशंख
गट विकास अधिकारी