
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
काय ढग काय गारा
वारा वाहे गरगरा
एक लहर तोडून गेली
धनुष्याचा खेळ सारा !
काय वारा काय पाऊस
गळून गेल्या काही धारा
साहेब झाले राव झाले
एक नाथाचा दरारा !
काय जखम काय वेदना
खपलीवरच ओरखडा
सोसत नाही साहवत नाही
मात्र आरडाओरडा !
काय तोरा काय बडबड
बिनपावसाची गडगड
ढग येतो रिता जातो
आवाजाविना तडतड !
ना चमचम सोनिया उन्हांत
ना शरदाच्या चांदण्यांत
एक सूरी वारा वाहे
बंडखोरांच्या गाण्यात !
काय ऊन काय रिमझिम
त्या इंद्रधनुचा तोरा
रंग अवधाचि भगवा
त्याचाच मोरपिसारा !
काय धूकं काय धूरकं
गढूळलेल सारं सारं
कसली नेकी कसली निष्ठा ?
बिनभरशाचं सारं सारं !
काय झाडी काय डोंगार
नजर ठरना तुमची माजी
अशा वक्ताला चिंब पावसात
हाणूया भजी ताजी ताजी !!
सुनील चिटणीस