
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- माधव गोटमवाड
============
महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसापासुन सुरु असलेलं सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. राज्याच्या मुख्यमंञी पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंञी पदी देवेंद्र फडवणीस यांनी शपथ घेतली आहे. पण ज्या उद्देशाने भाजपाने या घडामोडी घडवण्यात यशस्वी झाले होते. तो उद्देश माञ साध्य झाला नाही. की भाजपाच्या वरीष्ठ पक्ष श्रेष्ठीने देवेंद्र फडणवीसाचा उद्देश साध्य होऊ दिला नाही. हा चिंतनाचा विषय आहे.परंतु देवेंद्र फडवीस यानी आत्ताच सावध होण्याची खरी गरज आहे काय असे अनेकाना वाटत असले तरी आचानक मुख्यमंञ्या ऐवजी उपमुख्यमंञी पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकल्या जाते. याच्या पाठीमागे नेमके कोण आहे हे फडणवीसाना चिंतन करण्याची खरी गरज आहे. असे राजकिय विश्लेशकांना वाटत आहे. एकनाथ शिंदे याना मुख्यमंञी करण्यामागे भाजपाचा मोठा राजकिय डाव आसावा भाजपाने स्वत: सत्तेत दुय्यम भुमिका घेवुन शिंदे याना मोठेपण देण्यामागे भाजपाची व्युहनीती आसली तरी सध्यातरी भाजपाचे असे झाले आहे. आठ्ठाहसाने जावयासाठी स्वंयपाक केला अन् जावयाचा मावसभाऊ जेवुन गेला. अशी आवस्था सध्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची झाली असल्याचे कालच्या सत्ता नाट्यावरुन दिसुन आले आहे.त्याच बरोबर भाजपा पक्ष श्रष्ठीने कालच्या सत्ता नाट्यात एका दगडात दोन पक्षी गहाळ केले आहेत त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस होय हा विचार पुर्वक खेळलेला डाव आहे.असेच म्हणावे लागेल.
गेल्या २०जुन २०२२ पासुन सत्ता नाट्याला सुरुवात झाली. आणि हे सत्ता नाट्य जवळ पास दहा दिवस चालले आखेर दहा दिवसा नंतर ३० जुन रोजी या सत्ता नाट्यावर अखेरचा पडता पडला आहे. भारतीय जनता पक्षाला हेच साध्य करायच होते तर त्यांनी आडीच वर्षा पुर्वी शिवसेनेचा मुख्यमंञी का केला नाही. शिवसेनेचा मुख्यमंञी २०१९ मध्ये झाला आसता तर देवेंद्र फडणवीसावर उपमुख्यमंञी पद स्विकारण्याची वेळ आली नसती मी पुन्हा येईल असे म्हणत देवेंद्र फडणवीस यानी पायाला भिंगरी बांधुन फिराव तस देवेंद्र फडणवीस यानी सतत मुंबई दिल्ली वारी केली. आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात राहुन दिवसराञ बैठकाचे सञ सुरु ठेवले आणि सरकार कोसळण्याचा गेम साध्य केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंञी होणार म्हणुन भाजपा कार्यकर्त्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत होते. भाजपा कार्यकर्ते एकमेकाला पेढा भरुन आनंद साजरा करीत होते. एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंञी होणार अशा बातम्या मिडीयातुन दररोज झळकु लागल्या, प्रसारीत होऊ लागल्या पण आचानक देवेंद्र फडणवीसचे उलटे चक्र फिरले .आणि आचनक भाजपा पक्षश्रेष्ठीने ठरवुन गेम केला. आणि एका दगडात दोन पक्षी गहाळ करुन शिवसेने चे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपाचे माजी मुख्यमंञी देवेंद्र फडवणीस या दोघानाही एक प्रकारचा भाजपा पक्षश्रेष्ठीने ईशाराच दिला आहे. आम्ही कांही करू शकतो. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना भाजपाने पक्षश्रेष्ठीने दाखवुन दिले आहे . शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंञी पदाचा राजीनामा देण्यासाठी शिवसेनेत फुट पाडुन त्याच पक्षातील शिवसेना कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे याना मुख्यमंञी पदी बसविणे म्हणजे उध्दव ठाकरे यांचे राजकारणातले वजन कमी करणे होय तर देवेंद्र फडवणीस यांच्या भवती जो कार्यकर्त्याचा दिवसेन दिवस वाढत असलेला गराडा पाहुन त्याची राज्यात वाढत असलेली उंची व्यक्ती केंद्रीत होत असल्याने त्याचा राग आणि फडणवीस गेल्या कांही वर्षा पासुन मराठा लाॅबीचे राजकारण करीत आहेत. ओबीसीला जवळ करु लागले. त्यामुळेच भाारतीय जनता पक्षाच्या कांही वरीष्ठ नेत्याना हे आघड जाऊ लागले असेल आणि आपल्या पेक्षा ते लोकप्रिय होऊ लागले त्यामुळेच देेवेंद्र फडणवीस याना उपमुुख्यमंञी पदाची माळ जानीव पुर्वक पक्षश्रेष्ठीने त्यांच्या गळ्यात घातली असावी कारण कोणत्याही राजकिय पक्षात वरीष्ठा पेक्षा सामान्य कार्यकर्त्याची उंची वाढत असेेल त्याचेे मागे पाय ओढण्ययाची राजकारणात परंपरा आहे .असे म्हणटले वावगे ठरणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्या
माजी ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यानी २०१९ च्या आगोदर एका जाही सभेत वक्तव्य केलं होतं मला जनतेतुन मुख्यमंञी होणे आवडेल हे वक्त्यव्य गैर नाही पण अनेकाना हे वक्तव्या खटकले आणि त्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. की पराभव केला अशी त्यावेळ जनतेत जोरदार चर्चा होती. आज शिवसेनेत एवढा मोठा राजकिय भुकंप होतो. शिवसेनेचे आणि अपक्ष असे जवळपास ५० आमदारांचा गट तयार होतो हे शिवसेना पक्ष प्रमुखाना कसे समजले नाही. की शिवसेना पक्ष प्रमुखाची या आमदारावर पक्कड नव्हती. असेच म्हणावे लागेल. किंवा या सर्व आमदाराना पक्ष प्रमुखाना भेटु दिले नाही. हा संशोधनाचा विषय आहे. शिवसेना पक्षातील आमदारांची वेळो वेळी बैठक घेवुन त्यांची विचारपुस करणे त्याच्या आडी अडचणी सोडवणे हे पक्ष प्रमुखाचे काम आहे. पण तसे न झाल्यामुळेच शिवसेनेचा वेगळा गट बाहेर पडण्याचा शिंदेनी निर्णय घेतला असावा आणि त्याला पडद्यामागुन भाजपाची साथ असल्याने एकनाथ शिंदे गटाचे मनोधर्य अधिक वाढत गेले आहे. भाजपाने २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंञी न करण्याचा हट्ट धरल्यामुळे भाजपा शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडी उदयास आली याला भाजपा आणि शिवसेना तेवढीच जबाबदार आहे. तेव्हा पासुन भाजपा आणि शिवसेनेची अतर्गत धुसपुस सुरु झाली. आरोप प्रत्यारोप एकमेकावर करणे सुरु झाले या संधीचा फायदा माञ आडीच वर्ष काॅग्रेस राष्ट्रवादी काॅग्रेसने घेतला असे म्हणायला कांही हरकत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यानी मुख्यमंञी पदाची धुरा चांल्या प्रकारे सांभाळली आहे. कोरोना महामारीच्या काळात कुटुंबाचा प्रमुख जसा असावा त्या प्रमाणे त्यानी जनतेला धीर देत, आधार देत मुख्यमंञी पद सांभाळले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या र्हदयात चांगला मुख्यमंञी म्हणुन आपले नाव कोरले पण याला कोणाची तरी दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल.
हा शिवसेनेत राजकिय भुकंप पुर्वीच होनार होता असे राजकिय तज्ञाचा आंदाज आहे. पण सर्व शिवसेनेचे आमदार व कांही अपक्ष आमदार एकञ येण्याची जणुकाय एकनाथ शिंदे हे संधीची वाट पाहात होते. आणि ही संधी विधान परिषद निवडणुकीत आली सगळ कांही आगोदरच शिजलं असल्यामुळे ठरल्या प्रमाणे विधान परिषद निवडणुकी नंतर महाराष्ट्रात राजकिय भुकंपाला सुरुवात झाली २० जुन रोजी महाविकास आघाडी सरकाला त्यात शिवसेनेला सौम्य धक्का बसला .आणि शिवसेना हदरु लागली २० जुन पासुन शिवसेनेचे दररोज आमदार गटा गटाने शिंदे याच्या गटात सामिल होऊ लागले त्यामुळे शिवसेनेत अस्ववसस्ता पसरु लागली. या भुकंपाच्या केंद्रस्थानी शिवसेना असली तरी महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची तारांबळ उडाली होती. शिवसेनेचे तत्कालीन नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यानी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेचे आणि अपक्ष असे ५० आमदाराना घेवुन शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यानाच कोंडीत पकडले. हा सत्ता पालट करण्याचा खेळ जवळ पास एक वर्षा पासुन शिंदे आणि भाजपा गोटात शिजत असावा असे राजकिय तज्ञाचे मत आहे. पण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनातला प्रश्न असा आहे की, भारतीय जनता पक्षाने भाजपाची सदस्य संख्या १०६ आहे आणि एकनाथ शिंदे गटाची सदस्य संख्या ५० असुन राज्यातल्या मंञीमंडळात भाजपाने दुय्यमस्थान स्विकारुन एकनाथ शिंदे यांना प्रथम स्थान देवुन मुख्यमंञी केले आणि देवेंद्र फडणवीस याना उपमुख्यमंञी करण्यामागे भाजपा हायकमांचा मोठा डाव असु शकतो कारण भविष्यात एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश केल्यास मराठा कार्ड वापरता येते आणि शिवसेनाला एकनाथ शिंदे जस्यास तसे उत्तर देवु शकतात आणि एकनाथ शिंदे याच्या मागे मोठ्या प्रमानात मराठा समाज येवु शकतो हा विचार करुनच भाजपाने एकनाथ शिंदे याची मुख्यमंञी म्हणुन भाजपा हायकमांडणे निवड केली असावी आणि माजी मुख्यमंञी देवेंद्र फडवीस यांची राज्यात वाढत असलेली उंची हे भविष्यात भाजपाच्या कांही कार्यकर्त्याला माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा आडथळा येवु नये म्हणुन आत्ता पासुनच त्याचे पंख छाटण्याचे काम केले असावे असे अनेकाला वाटु लागले आहे. परंतु ज्या राजकिय पक्षाची उमेदवारी घेवुन त्या पक्षाच्या तीकीटावर निवडुन येने आणि दुसर्या राजकिय पक्षा बरोबर घरोबा करणे ही बंडखोरी कोणत्याही राजकिय पक्षाला परवडणारी नाही. कारण कोणत्याही राजकीय पक्षातुन त्या पक्षाला रामराम ठोकुन आमदार खासदार पक्ष सोडुन गेल्याने राजकीय पक्ष संपत नाही. हा आजवरचा इतिहास आहे हे आमदार आणि खासदार व कार्यकर्त्यानी लक्षात घ्यावे, कार्यकर्ते संपतात पण राजकिय पक्ष संपत नाही. हा अजवरचा इतिहास आहे.
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे
कंधार जि.नांदेड
मो. ९५६१९६३९३९