
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जव्हार:- तालुक्यातील न्याहाळे येथील दोन भावंड सचिन 7 वी ,कामिनी 3 री वर्गात शिक्षण घेत असून शिक्षण घ्यायची इच्छा आहे पण शिक्षणास हात देणारा सोबत कुणी नाही.
दोन वर्षा पूर्वी आई वडील कायमचे सोडून देवाघरी गेले. सध्या आजी कडे राहत असून दोन्ही भावंड अभ्यासात हुशार व प्रामाणिक आहेत. शिक्षणासाठी वही,पुस्तक,कंपास,दप्तर,चप्पल, छत्री व शालेय गणवेशया गोष्टींची आवश्यकता भासत असून समाज बांधवांना संतोष गोविंद या समाज बांधवाने विनंती केली असता काल सदर विद्यार्थींना मदतीचा हात देण्यासाठी तुषार सुर्यवंशी, विस्तार अधिकारी मोखाडा यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल टोपले यांचे सोबत जाऊन भेट घेतली असता सदर दोन्ही मुलांना वह्या दिल्यात तसेच त्यांना राहण्यासाठी कच्चे घर बघून जव्हार पंचायत समिती येथून शबरी आवास योजनेतून घरकुल मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सोबत संतोष गोविंद आणि समाज बांधव उपस्थित होते