
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
1 जुलै म्हणजे कृषी दिन या दिवशी हरित क्रांतीचे जनक स्व.श्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदीन म्हणून साजरी केली जाते.वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवांच्या प्रती आदर व्यक्त करणे हे या दिवसाचे वैशिष्ट्य कृषी दिनाच्या निमित्ताने गंगापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी यांचा सोयाबीन तसेच आदी पिकांच्या उत्पादनात योग्य नियोजन व उत्पादकता वाढीसाठी केलेले प्रयत्न या बाबीसाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उन्हाळी सोयाबीन उत्पादन,रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी आणि,अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन च्या वाणाची पेरणी हे प्रयोग तालुक्यातील अगरवाडगाव येथील प्रगत शील शेतकरी श्री.पांडुरंग वाघ नेहमी आपल्या शेतात करत असतात. व परिसरातील इतर ही शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या प्रयोगशीलतेचा परिसरातील इतर शेतकरी बांधवांना फायदा होतो.आणि त्यांच्या प्रयत्नामुळे गंगापूर तालुक्यातील सोयाबीन पिकविणाऱ्या गोदावरी पट्ट्यात सोयाबीन बियाण्यांसाठी परिसरातील शेतकऱ्यांना इतर ठिकाणी बियाणे खरेदी करावी लागत नाही. यावेळी कायगाव येथील प्रयोगशील शेतकरी राहुल कुलकर्णी,भेंडाळ्याचे प्रयोगशील शेतकरी विक्रम परभने शंकरपूर येथील अभंग शेवाळे जामगाव येथील उमेश बंग आदी यांचा जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेशवर तारगे,कृषी मंडळ अधिकारी विष्णू मोरे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनची उल्लेखनीय कामगिरी
1 पांडुरंग वाघ – उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी विक्रमी उत्पादन
2 विक्रम परभने – तुर व सोयाबीन पिकाचे योग्य नियोजन
3 अभंग शेवाळे – सोयाबीन नंतर हरभरा पिकाचे उत्पादन
4 राहुल कुलकर्णी – ऊस पाचट कुजविणे
5 उमेश बंग – सोयाबीन तसेच आधी पिकांचे योग्य नियोजन करून विक्रमी उत्पादन