
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा .
माण तालुक्यांतील गोंदवले दहिवडी मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने शासन कामगारांसाठी नेहमीच विविध योजनांचे उपक्रम राबवत असतं. गोंदवले दहिवडी माण तालुक्यांमध्ये नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना दररोज मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात धर्मवीर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमांतून नुकतीच सुरु करण्यांत आली. मध्यान्ह भोजनास परिसरानतील कामगारांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य शासन संघटित असलेला बांधकाम कामगारांसाठी विमा तसेच भोजन आजारपणात व कामगारांच्या विवाहासाठी मदत आदी राबवत आहेत. बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक गवंडी, प्लंबर बिगारी आदींना शासनांच्या विविध सुविधा मिळत असून याचा चांगलाच फायदा कामगारांना होत आहे. नुकतीच माण तालुक्यांतील दहिवडी गोंदवले अशा विविध ग्रामीण भागातून पहिल्याच दिवशी अनेक कामगारांनी या मध्यान्ह भोजनाचा आनंद घेतला. पहिल्याच दिवशी १८८ कामगारांनी भोजनाचा लाभ घेतला. यावेळी धर्मवीर कामगार संघटनेचे सर्व स्थापक अध्यक्ष मा. अमित कुलकर्णी, मा.प्रवीण कुटे,मा. सुनील मगर मा.सचिन गिरी गोसावी मा. प्रकाश पुरी गोसावी आदींची उपस्थिंती होती