
दैनिक चालु वार्ता लोहा तालुका प्रतिनिधी -भरत पवार….
येथुन जवळच असलेल्या कारेगाव येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व भारिप बहुजन महासंघाचे माजी युवा जिल्हाधक्ष अनिलदादा गायकवाड यांचे राजकीय, सामाजीक कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अनिलदादा गायकवाड यांची रिपब्लिकन सेनेच्या मराठवाडा सदस्यपदी निवड करण्यात आली. व मराठवाडा विभागीय कार्यालयात मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते अनिलदादा गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मराठवाड अध्यक्ष माधवदादा जमदाडे, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे, जिल्हा उद्योग केंद्राचे सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे वन्ने, लोहा नगर परिषदेचे नगरसेवक प्रतिनिधी बालाजी खिल्लारे आदींनी अनिलदादा गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.