दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
आज शनिवारी महाराष्ट्र राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन दर्शन घेतले
मंत्री छगनजी भुजबळ आज शनिवार रोजी बीड जिल्ह्यात आल्यानंतर परळी येथील गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी भुजबळ म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमी एकत्रित होतो. गोपीनाथराव भाजपामध्ये असले तरी मला नेहमी म्हणायचे की ओबीसींच्या मुद्द्यावर मी तुमच्या बाजूनेच आहे. गोपीनाथराव आणि माझं नातं हे बंधुतुल्य होतं. असे ही त्यांनी या वेळी व्यक्त केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती