
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
शंकरपुर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार,रोजी दि.२ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. संतोष राजाराम कहाटे (४५,रा. शंकरपूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.संतोष कहाटे यांनी शनिवारीज्ञसायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शंकरपूर येथील शेतवस्तीवरील राहत्याघरासमोरील लिंबाच्या झाडाला दोरीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीस येताच घरच्यांनी तातडीने आरडाओरडा केल्याने मोठा भाऊ जालम राजाराम कहाटेसह इतरांनी त्यास प्रथम लासूर स्टेशन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये आणून त्यानंतर येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तैसीन शेख यांनी तपासून मृत घोषित केले. रविवारी सकाळी मृत शेतकऱ्यांवर उत्तरीय तपासणीनंतर शंकरपूर येथे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत. मृत शेतकऱ्याच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे