
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर🙁 गोविंद काळे )राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त अहमदपूर येथील युवा औषध विक्रेते संजीवनी मेडिकलचे श्रीधर सांगुळे पाटील यांनी माणसातील देवांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याप्रती अहमदपूर येथील डॉक्टर्स चा सन्मान सोहळा दि १ जूलै 2022 रोजी ‘ हॉटेल यश -2 ‘ लातूर रोड , अहमदपूर येथे आयोजित केला होता . महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झी टॉकीन फेम किर्तनकार ह.भ.प. गाथामूर्ती श्री कृष्णदास महाराज महाळंगकर यांच्या हस्ते आणि अहमदपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज डॉ . राजुरकर , डॉ . मधुसूदन चेरेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा संपन्न झाला .
यावेळी डॉ . निलेशजी मजगे , डॉ . सतिशजी पेड , डॉ . बाळासाहेब मूंढे , डॉ . शशिकांतजी गुणाले , डॉ . तुकाराम बेंबडे डॉ . बालाजी मुंडे , डॉ . अर्चना भुरे , डॉ . कासले मॅडम डॉ . श्रीकांत पाटील , डॉ . जाधव यांचा या सोहळ्यामध्ये यथोचित सन्मान करण्यात आला . गाथामुर्ती ह.भ.प. कृष्णदास महाराज महाळंगकर यांनी डॉक्टरांप्रती आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . नागनाथ कदम यांनी , सुत्रसंचलन बालाजी तुरेवाले आणि आभार दशरथ जाधव यांनी व्यक्त केले . यावेळी सेवानिवृत्त विस्ताराधिकारी वामनराव सांगुळे , अहमदपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे , सेवानिवृत केंद्रप्रमुख बब्रुवानजी पवार माधवजी कंदे , गणपतरावजी कानवटे , सटवाजी कांबळे , जीवन नवटक्के उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी मेडीकलचे श्रीधर पाटील , सिद्धेश्वर आमदार , सचिन रेचवाड यांनी परीश्रम घेतले