
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रतिनिधी मोलगी
माजी जिल्हा परिषद सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगलसिंग कोमा वळवी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले.त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडली आहे.
काही दिवसांपुर्वीच मंगलसिंग वळवी यांचे सुपुत्र सुरेश वळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यां सह शिवबंधन बांधले होते त्यामुळे मंगलसिंग वळवी हे देखील शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा जोर धरुन होती. आज मंगलसिंग वळवी यांनी जिल्हा संपर्क कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करुन घरवापसी केली आहे.मंगलसिंग वळवी हे सर्व प्रथम शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडुन आले होते त्यांनंतर शिवसेनेने अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवुन मंगलसिंग वळवी यांना उमेदवारी दिली होती.मात्र नंतरच्या काळात मंगलसिंग वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.काँग्रेसच्या तिकिटावर मंगलसिंग वळवी यांची कन्या निशा वळवी अक्कलकुवा पंचायत समितीत सभापती पदी विराजमान झाल्या होत्या.सध्या मंगलसिंग वळवी यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची सुत्र होती त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसला विशेषतः माजी पालकमंत्री आ.ऍड.के.सी.पाडवी यांना मोठा धक्का मानला जात आहे. मंगलसिंग वळवी यांना व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आ.आमश्या पाडवी यांनी शिवबंधन बांधून प्रवेश दिला.
मंगलसिंग वळवी यांना शिवसेनेत आणण्यासाठी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख किशोर ठाकूर यांनी प्रयत्न केलेत.प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, युवा सेना ललित जाट,युवा सेना समन्वयक रोहित चौधरी,पंचायत समिती सदस्य जेका वळवी,पृथ्वीसिंह पाडवी,तुकाराम वळवी,कान्हा नाईक,टेडग्या वसावे,, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव आदी उपस्थित होते