
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमतः वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य मुंडे एम.एम. यांनी केले व तसेच त्यांच्या विचारावर मनोगत व्यक्त केले तर प्रा. कदम आर.एल. यांनी वसंतराव नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आत्मसात करावे व त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवावी असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.मुनेश्वर अतिश यांनी केले उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रा. शिंदे टि.बी. प्रा.राजरवाड बी.बी.प्रा.कदम आर.एल.प्रा.मुनेश्वर ए.वाय. श्री.बैनवाड साहेबराव ( प्र.सहाय्यक ) श्री.केंद्रे पांडूरंग यांनी आपली उपस्थिती दर्शवली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.राजरवाड बालाजी यांनी व्यक्त केले.