
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगव्हाण येथे घरासमोरील अंगणात पाणी टाकण्याच्या कारणावरून जेठाची सूनेस लोटलाट,शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी महिलेने रहिमापूर पोलीस स्टेशन मध्ये आज सकाळी तक्रार दाखल केली.अंजनगाव तालुक्यातील पिंपळगव्हाण येथे दोन भाऊ शेजारी शेजारी राहत असल्याने लहान भावाच्या पत्नीने अंगणात पाणी टाकले व ते मोठ्या भावाच्या घरासमोर गेले ते पाणी तू जाणीवपूर्वक टाकले या कारणावरून जेठ व जेठानीने सुनेस शिवीगाळ करून लोट लाट केले व जिवे मारण्याची धमकी दिली त्यावरुन फिर्यादी महिलेने रहिमापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जेठ व जेठानी विरूद्ध ३२३,५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला