
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेनेने जारी केलेल्या व्हीपनुसार मतदान न केलेल्या ३९ बंडखोर आमदार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
याबाबत आज नव्या विधानसभा अध्यक्षांकडे आपण याचिका दिली असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज दिली.
अरविंद सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्रात सध्या रात असवैंधनिक काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर जास्त आमदार असलेल्या पक्षाला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं. मात्र, तसं झालं नाही. ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाची नोटीस त्यांनी शपथ घेतली. आम्ही व्हीप जारी केल्यानंतरही ३९ आमदारांनी व्हीप पाळला नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे पीटिशन दाखल केलं’ असल्याचं सावंत म्हणाले.
तसंच त्या ३९ आमदारांवर कारवाई केली पाहिजे, त्यांना अपात्र केलं पाहिजे अशी मागणी आपण विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली आहे. उद्या सकाळी शिवसेनेचं कार्यालय उघडं होईल. आज रविवार म्हणून कार्यालय बंद असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं.
तसंच शिवसेना हा रजिस्टर पक्ष असून या पक्षात पक्षप्रमुखांचेच आदेश चालतात, तुम्ही कोण? तुम्हाला मान्यता आहे का? असा सवालही त्यांनी शिंदे गटाला उद्देशून केला. तसंच भरत गोगावले यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.