
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर परिसरातून उत्साहात मार्गस्थ झाला. यावेळी येथील भाविक व नागरिकांनी हरिनामाचा जयघोष करीत विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.इंदापूर शहर शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले व शहर समन्वयक संजय खंडागळे यांच्या मित्र परिवारच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करून,५ हजार वारकऱ्यांना मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले .
पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूर जाणाऱ्या जेष्ठ वारकऱ्यांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात असते.याच वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत गोळ्या औषधे बाबा चौक येथे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर साहेब,तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले अरुण पवार उपशहर प्रमुख अशोक देवकर, बालाजी पाटील, सुदर्शन साखरे, उपतालुका प्रमुख विजय साखरे, शहर संघटक अवधूत पाटील, शाखाप्रमुख संतोष क्षीरसागर, देवा मगर, इंदापूर तालुका महिला संघटिका सुरेखाताई लोहार, उपतालुका महिला संघटिका ज्योती ताई गाढवे,व महिला आघाडीच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी विनोद राजपुरे, शिवसेना आरोग्य मदत केंद्राचे भूषण सुर्वे,सागर आवटे,व परिचारिका यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधांचे वाटप केले.