
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा : खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या धाडसामुळे दोन जुळ्या बालकांना जीवनदान मिळाले आहे मोखाडा तालुक्यातील बोटोशी येथील ही घटना आहे
तालुक्याच्या मुख्यालयापासून 30 ते 35 किमी अंतरावर वसलेले बोटोशी (गावठा) येथील सीता वसंत दिवे या गरोदर मातेला दिनांक 2 जुलै शनिवार रोजी 12:00 वाजताच्या दरम्यान प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या परंतु दवाखान्यात पोहचवण्यासाठी रस्त्याची अवस्था बिकट असल्याने या गरोदर मातेला दवाखान्यात कसं पोहचवायचं असा प्रश्न निर्माण झाला यावेळी या गरोदर मातेला दवाखान्यात पोहचवण्यासाठी कुटूंबियांकडून आटापिटा सुरू असताना यामध्ये बराच कालावधी उलटल्याने एका बालकाला तिने घरीच जन्म दिला
यानंतर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात या घटनेची माहिती दिल्या नंतर तात्काळ येथून रुग्णवाहिका व नर्स पाठवण्यात आली
खराब रस्त्याची वाट पार करत घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचली परंतु मुसळधार पावसामुळे दगडी मातीचा रस्ता पूर्णता निखलमय झाला होता यामुळे रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ करत असताना चिखल व पावसामुळे नदीच्या प्रवाहकडे सरकत जात होती परंतु तरी देखील वाहन चालक देवीदास पेहरे यांच्या धाडसामुळे व येथील गावकऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे या गरोदरमातेला सुखरूप दवाखान्यात पोहचवण्यात आले यावेळी या वाहनचालकाने केलेल्या धाडसाचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे तसेच या मातेने दुसऱ्या बाळाला देखील सुखरूप जन्म देऊन जव्हार कुटीर रुग्णलयात उपचार घेतआहे.
सदरची घटना ही भयानक असून वाहन चालक देवीदास पेहरे व आरोग्य विभागाच्या टीमचे कौतुक करावे तितके कमीच आहे त्यांच्या या कामगिरीची आम्ही देखील दखल घेऊन आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा सन्मान केला आहे
प्रदीप वाघ : अध्यक्ष( संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य)
रास्ताची अवस्था बिकट असल्याने त्याचच मुलसधार पावसामुळे रस्ता पूर्णता चिखलमय झाल्याने घटनास्थळी पोहचने जीकरीचे झाले होते जिखलामुळे व पावसाच्या प्रवाहामुळे रुग्णवाहिका नदीच्या प्रवाहकडे सरकत जात होती परंतु गावकऱ्यांनी वेळीच मदत केल्याने या गरोदर मातेला सुखरूप दवाखान्यात पोहचवू शकलो
देवीदास पेहरे( वाहन चालक)
अश्या घटना वारंवार आमच्या भागात उद्भवत आहेत याकडे लक्ष देऊन येथील रस्त्याचा प्रश्न प्रशासनानेलवकरात मार्गी लावावा
तुकाराम पवार( ग्रामस्थ