
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- आगारातील प्रभारी वाहतुक नियंत्रक मुकेश भगत यांचा प्रमाणीकपणाचे जफ्राबाद दिंडीच्या वारकऱ्यां कडून कौतूक करण्यात आले.जफ्राबाद ते पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील एक वयोवृद्ध वारकरी चक्कर येऊन भूम बस स्टॅण्ड मध्ये पडले होते. त्यांचा मोबाईल व 10,000 रुपये पडले ते प्रभारी वाहतूक नियंत्रक मुकेश भगत यांनी सदर दिंडी चालकाला महिती देऊन त्यांचे पैसे व मोबाईल परत केला. त्यामुळे त्यांचे भूम आगारातील कर्मचारी ,आगार प्रमुख अलकुंटे साहेब , सुरवसे साहेब यांनी त्यांच्या इमानदारीचे कौतूक केले.