
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- वसंत आवटे
औरंगाबाद– सामाजिक कार्यात विशेष योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे नुकत्याच काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात इफ्का लॅबोरेटरीज कंपनीचे व्यंकट मैलापुरे ( एच.आर.हेड ) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले होते. पुरस्कार मिळाल्याने मैलापुरे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दखल घेऊन कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेऊन श्री व्यंकट मैलापुरे यांचा शाल व श्रीफळ भेट देऊन श्री मैलापुरे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या …कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांनी केले…यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्तिथी होती…