
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
मनवाणी अंजन टेंबा पाडा येथील कृष्णा अर्जुन भजनी मंडळास ग्रामपंचायत कार्यालय मनवानी बुद्रुक यांच्या चालु वर्षातील पेसा निधीतून 5 टक्के रक्कम निधीतून साहित्य ग्रामपंचायत मनवाणी बुद्रुकचे सरपंच सौ. प्रियंकाताई गुलाबसिंग राहसे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने पेसा निधीतून हा स्तुत्य उपक्रम राबवून मंडळाला भजन, किर्तनासाठी साहित्य देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी भजनी मंडळास पकवाज, वीणा,टाळ – मृंदुग, पेटी आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत मनवाणी बुद्रुकचे सरपंच सौ. प्रियंकाताई गुलाबसिंग राहसे, ग्रामसेवक श्री. निलेश सोनवणे, ग्रामसभा कोष समितीचे अध्यक्ष श्री. रायसिंग वळवी, प्रा. श्री. गुलाबसिंग राहसे सर, श्री. सुमित तडवी,लालचंद राहसे, रिंकु वळवी, दिना वळवी, वंदना वळवी, छोटु वळवी, यांच्या उपस्थितीत भजनी साहित्य वाटप करण्यात आले.