
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर/प्रतिनिधी
शहरातील नामांकित शाळेपैकी एक शाळा म्हणून ओळखली जणारी शाळा म्हणजे सावित्रीबाई फुले प्रा व मा विध्यालय हे आहे.या शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री बिरादार यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजन करण्यात आला होता .
शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अखंड ज्ञानावर माझी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षक म्हणजे ज्ञानाची विहीर व विद्यार्थी म्हणजे विहिरीबाहेर असलेला पोहरा आहे. ज्ञानाने विहीर भरलेली असेल तरच विद्यार्थ्यांच्या पोहऱ्यात ज्ञान मिळू शकेल, असे मत संस्थेचे अध्यक्ष राजाराम गजभारे यांनी यावेळी व्यक्त केले.
शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे गटशिक्षणाधिकारी जाधवर यावेळी म्हणाले.
——————————–
मानव विकास योजने अंतर्गत 39 मुलींना सायकल वाटप
घरापासून शाळेचे अंतर दूर असल्यामुळे बरेच विद्यार्थीनी सायकलने शाळेत येत असतात. परंतु सायकल खरेदी करण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे राज्य सरकारने मुलींना सायकल वाटप योजना लागू केली मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल मिळते त्या योजने अंतर्गत सावित्रीबाई फुले मा विद्यालयाच्या इयत्ता 8 वी या वर्गात शिकत असलेल्या 39 मुलींना या अंतर्गत सायकल वाटप करण्यात आली.
————————————-
‘आम्हाला आज खूप भारी वाटतंय’… आमच्या नव्या सायकली खूपच छान आहेत. शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही. आता आम्हाला शाळेत पायी जाण्याची गरज नाही…’ आम्हाला या योजनेचा लाभ भेटल्याने आम्हा प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे.
-लाभार्थी विद्यार्थिनी
———————————
गुणवंत सत्कार सोहळा
सन 2021-22 या वर्षात घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला या वेळी निलेश कांबळे,नंदिनी बंडेवार,संकेत सोनकांबळे,संजना शिं नगारे,गायकवाड गंगासागर,गायकवाड निकिता,ज्ञानेश्वर नाईक आदी गुणवंत उपस्थित होते.
———————————
यावेळी श्री.रा.न.गजभारे संस्थापक अध्यक्ष लोकहित शिक्षण संस्था,अँड.जयवंत राजाराम गजभारे सचिव,लोकहित शिक्षण संस्था,जाधवर गटशिक्षण आधिकारी,झंपलवाड शिक्षण विस्तार अधिकारी,देगलूर,वडजे सर शिक्षण विस्तार अधिकारी,मुखेड,दत्ता पांचारे मानव विकास समन्वयक,सौ.आर.रा.गजभारे (सदस्य लोकहित शिक्षण संस्था,वाय.आर गजभारे,उपाध्यक्ष लोकहित शिक्षण संस्था,पाटील के.सी मु.अ.,एकनाथ गोजेगावे सरपंच बोरगाव,ज्ञानेश्वर बिरादर ,दीपक गायकवाड,श्रीमती.ज्योती गजभारे,विट्ठल रेड्डी,अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक,देगलूर,कंधारकर सदस्य लोकहित शिक्षण संस्था,देगलूर
व विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर,विद्यार्थी व पालकवर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.