दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
अर्धापूर – तालुक्यातील बेलसर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दादाराव पाटील क्षीरसागर यांची तर व्हाईस चेअरमन पदी पुंडलिक हातने यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय जळके,सहाय्यक सखाराम पवार यांनी करताच जल्लोष करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके,माजी सभापती शामराव पाटील टेकाळे,भाऊराव कारखान्याचे संचालक व्यंकटराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलसर
सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली तर चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक दि ४.सोमवारी रोजी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत चेअरमन पदासाठी दादाराव पाटील क्षीरसागर,व्हाईस चेअरमन पदासाठी पुंडलिक हातने दोनच अर्ज आल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करताच चेअरमन दादाराव पाटील क्षीरसागर,तर व्हाईस चेअरमन पुंडलिक हातने यांचा सत्कार करत फटाक्यांची अतिष बाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी शेतकरी सेनेचे रमेश पाटील क्षीरसागर,शिवसेनेचे अशोक डांगे,पत्रकार सखाराम क्षीरसागर,माजी सरपंच साहेबराव सोळंके,संचालक कोंडीबा भोकरे,बालाजी क्षीरसागर,व्यंकटी पेरगोड,गंगाराम माटे,शिवाजी क्षीरसागर,बालाजी दिगंबर क्षीरसागर,शिवाजी क्षीरसागर,शंकर बरकमकर,सौ.देवकाबाई श्रीरंग क्षीरसागर,लालबा क्षीरसागर,व्यंकटराव क्षीरसागर,ग्यानबा हातने,अरविंद क्षीरसागर,शिवाजी सोनटक्के यांच्या सहअनेक गावकऱ्यांनी चेअरमन दादाराव पाटील क्षीरसागर,व्हाईसचेअरमन पुंडलिक हातने यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी अनेकजन उपस्थितीत होते.