दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वडाळी शेत शिवारात काल सायंकाळी अज्ञात चोरट्यानी डिपी तील फ्यूज व केबल चोरुन नेल्याची घटना घडली.याची माहिती आज मंगळवार रोजी वडाळी शेत शिवारातील शेतकऱ्यांनी दिली.दिनांक ३ जुलै रोजी वडाळी शेत शिवारातील लाईन बंद होती.शेत शिवारातील वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वडाळी शेत शिवारातील तिखीले डी.पी. वरील फेज तोड-फोड करून त्यामधील तांब्याच्या पट्ट्या,केबल समवेत डीपीतील फ्यूज चोरुन नेले.आज सकाळी शेतकरी ओलित करायला गेले असता त्यांना फ्यूज,केबल व फेज मधील तांब्याच्या पट्ट्या आढळुन आल्या नाही.त्यामुळे त्यांना कोणीतरी चोरुन नेल्याची शंका आली.सदर डीपीवर अशा घटना चार पाच वेळा घडल्या असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.सदर घटनेची माहिती वितरण कंपनीच्या सुर्जी विभागाला देण्यात आली आहे अशी माहिती मिळाली.