दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : बिबवेवाडी परिसरातील एका व्यवसायिकाच्या घरातून तब्बल ३० लाख रूपयांच्या ६० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्या मुख्य आरोपीकडे तपास करून बिबवेवाडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपीच्या मेव्हण्याच्या घरातील फ्रिजखाली लपविलेले हे ६० तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुनेद रिझवान सैफ (२९ रा. ग्रीनपार्क, शेरखान चाळ, कोंढवा) आणि हैदर कल्लु शेख (३१, रा. वसवाडी, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी मुख्य आरोपी मुश्तफा उर्फ बोना उर्फ पाटी शकिल अन्सारी (वय.३४रा. ग्रीन पार्क शेजारी सर्वे नं.४२ कोंढवा) अटक करण्यात आली होती. अन्सारी हा रेकॉर्डवरील सराईत चोरटा असून त्याच्यावर चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत.
ही घटना दहा दिवसांपूर्वी सवेरा अपार्टमेंट डी विंग बिबवेवाडी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.