दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग नांदेडचे उपअभियंता तथा लोह्याचे भुमीपुत्र प्रशांत सोमनाथ भोस्कर ३९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवे नंतर दि.३० जुन २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.नुकताच नांदेड विभागाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.
त्यांच्या कार्यकाळात नांदेड कंधार जांब जळकोट उदगीर तोंडारी ह्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५० चे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.तसेच उस्माननगर शिराढोण हाळदा कौठा मुखेड बाराळी हानेगांव वझर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ ए या राष्ट्रीय महामार्गाचे काम. झालेले आहे. सेवानिवृत्ती निमित्त राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड च्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी हटकर,हाके उपअभियंता तसेच कर्मचारी, सर्व ठेकेदार, कन्सल्टिंग इंजिनिअर सह सर्व उपस्थितांनी यांना शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त प्रशांत भोस्कर हे सोमनाथ भोस्कर यांचे जेष्ठ चिरंजीव असून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकरीता जागा देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. लोहा येथील त्यांचे मित्र रमाकांत गुंडाळे, सुभाष तेललवार, दिनेश तेललवार, डॉ.कल्याणमवार मारोती सर्व मित्रांसह आप्तस्वकीय मित्रमंडळींनी त्यांच्या भावी जीवनास शुभेच्छा दिल्या.