दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – लासूर स्टेशन ते दिवशी पिंपंळगावच्या नाशिक महामार्गपर्यंत खड्डेच खड्डे पावसाने साचले तळे, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय कसरत असे वृत्त दैनिक चालू वार्ता ने प्रकाशित केले होते त्याची दखल घेत ठेकेदाराने लासूर स्टेशनपासून काम चालू केले मात्र या रस्त्याचे खड्डे बुजवताना रस्त्याच्या कामात सर्रासपणे काळी पोयटा माती वापरली जात आहे.
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन, डोणगाव, रायपूर रस्ता जीवघेणा झाला असून रस्त्यात खड्डा कीं खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने ऐन पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी सांचल्याने शाळकरी मुलांना मात्र या रस्त्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र या रस्त्याच्या निविदा निघून झाले तीन वर्ष मात्र कामाला मुहूर्त लागला नसल्याने डोणगाव, रायपूरकरांचा रस्ता मात्र खडतर होता यामुळे धमोरीचे उपसरपंच रवी पाटील चव्हाण यानी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यानी लेखी पत्र दिले होते मात्र त्यानंतर ठेकेदाराने यां रस्त्याच्या कामाला सुरुवात केली व खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले मात्र हे काम पालथ्या घड्यावर पाणी असून हे खड्डे बुजवताना काळी माती वापरली जात असून यां रस्त्याचे आयुष्य पुन्हा क्षणभंगूर असून मृगजळ ठरणार आहे त्यामुळे कामामध्ये काळी वापरणाऱ्यात येऊ नये अशी मागणी नागरिक करत आहे.
प्रतिक्रिया:- बद्रीनाथ रासकर (कानिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम )लासूर स्टेशन ते दिवशी पिंपळगाव रस्त्यातील खड्डे बुजवण्यांचे काम चालू असून याबाबत दैनिक मराठवाडा साथीने अभियंता रासकर यांना काळी माती कामात वापरले जात असल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डे बुजवले जात असून या रस्त्याचे मटेरियल पाण्याने वाहून जाऊ नये म्हणुन तात्पुरत्या स्वरूपात हे काम चालू असून पावसाळ्यानंतर रस्ता पूर्णपणे उकरून नवीन रस्ता होणार असल्याचे सांगितले.
रवींद्र पाटील चव्हाण (उपसरपंच, धामोरी )डोणगाव रस्त्याच्या काम इस्टीमेटप्रमाणे दर्जेदार करण्यात यावे व खूप दिवसाच्या नंतर काम होणार असल्याने कामात हयगय करण्यात येऊ नये.