दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी.
उस्मानाबाद जिल्ह्यांचे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष तरुण तडफदार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडूंन पदभार घेतल. उस्मानाबाद जिल्ह्यांचे तत्कालीन पोलीस अधीक्षक निवा जैन मॅडम यांनी उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अवैध धंदे मोकांतर्गत तसेच अनेक कारवाया निवा जैन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रथमच पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यांला प्रथमच शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधीक्षक मिळाल्या. त्यांच्या बदलीनंतर गेले दोन महिन्यापासून उस्मानाबाद जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवा जैन मॅडम यांनी दिला होता. अखेर राज्य विभागांने अतुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद जिल्ह्यांची जबाबदारी दिली.अतुल कुलकर्णी यांनी यापूर्वी हिंगोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून ते काम पाहत होते त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची प्रशासनामध्ये त्यांनी ओळख निर्माण केले आहे. अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यांत हजर होऊन पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस मुख्यालयांतील उपअधीक्षक( ग्रह) श्रीमती अंजुमन शेख यांच्यासह पोलिस अधिकारी अमलदार व पोलीस कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती