दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि. ५.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बुलडाणा ( उत्तर ) च्या वतीने कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विविध स्तुत्य उपक्रम राबविले. ह्यामध्ये संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या २४ प्रकारच्या शिबिरापैकी २३ प्रकारचे शिबिरे राबविली, ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रवचन मालीका यांचा समावेश आहे. जिल्हात घेतलेल्या धम्मयान मासीक वाचक मेळाव्याची राज्यासह केंद्रीय कार्यकारिणीनेही दखल घेतली.जिल्हा शाखेने केलेल्या कार्याची
दखल घेऊन पहिला ऐतिहासिक धम्म मेळावा बुलडाणा जिल्ह्यात घेण्याची पहिली संधी उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळेच केंद्रीय कार्यकारिणीने बुलडाणा जिल्हा (उत्तर ) वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी खामगांव येथे दि.१७ जुलैला होऊ घातलेला ऐतिहासिक धम्म मेळावा यशस्वी करण्याचे आव्हान जिल्हा अध्यक्ष एस एस वले यांनी केले. ह्या धम्म मेळाव्याला केंद्रीय कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डाॅ. हरीष रावलीया, ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर,राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगरे इत्यादींचा समावेश आहे.आनंद बुद्ध विहार शेगांव येथे झालेल्या या बैठकीला घाटाखालील नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, खामगांव ,जळगांव जामोद या तालुक्यातील तसेच जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या बैठकीचे संचलन जिल्हा सरचिटणीस बि के हिवराळे, प्रास्ताविक कोषाध्यक्ष के के शेगोकार यांनी केले. ह्यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ए एन वानखडे, के एम हेलोडे, पद्ममीनी तायडे, आर आर जवरे, जगदीश हातेकर, विनेश इंगळे, इश्र्वर दाभाडे,मोहन इंगळे,हरीष अजने यांनी मार्गदर्शन केले.