दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा. पालघर जिल्ह्यांचे डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रशासन विभागांमध्ये आपली ओळख असलेले पालघर जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माजी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडूंन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मोका अंतर्गत तसेच अनेक कारवाईं करीत पालघर जिल्ह्यांतील गुन्हेगारीवर त्यांनी चांगलाच वचक ठेवला होता. त्यांनी यापूर्वी विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये यासह सांगली जिल्ह्यामध्ये त्यांची कर्तव्यदक्ष कामगिरी ठरली. सांगली जिल्ह्यांमध्ये सुद्धा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे सांगलीकरांच्या अजून आठवणीत आहेत. त्यांना आता ठाणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यांत आली. तर पालघर जिल्ह्यांचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा यापूर्वी ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून ते कार्यभार सांभाळत होते. राज्य गृह विभागांने ठाणे व पालघर आयुक्त कार्यालयांतील दोन बड्या अधिकाऱ्यांची अदलाबदल केली.