दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
शिंदोला ते घुग्घुस या मार्गा अंतर्गत कोलगाव खदान चेकपोस्ट ते कोलगाव वळनरस्ता या 1.5 किमी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. वेकोली अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही ते लक्ष देत नाहीत. शासकीय रस्त्यावर त्यांनी स्वतःची मनमानी बेकायदेशीर रित्या सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना, विद्यार्थ्यांना, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या करीत.
म्हणून वेकोली मार्फत हा दुरुस्त करण्यात यावा. याकरीत मा.श्री. विजयभाऊ पिदूरकर (माझी जिल्हा परिषद सदस्य, यवतमाळ) यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 4 जुलै 2022 रोजी मा.उपविभागीय अधिकारी साहेब वणी यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम तत्काळ न केल्यास वेकोली विरोधात लोकशाही मार्गाने दिनांक 08,07,2022 ला रास्तारोको, चक्काजाम आंदोलन करू असा निवेदनातुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
त्यावेळी मा.गणेशजी जेनेकार (सरपंच कोलगांव), मा.निखिलजी उपासे (ग्राम.पं.सदस्य,साखरा), विश्वासजी बोरपे(ग्राम.पं.सदस्य,शिवनी), मा.अरविंदजी उपासे आणि मा.सुनीलजी माथुलकर आदि उपस्तित होते.