दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मनुष्य हा विद्वान प्राणी ,जेवढा , बुद्धिमान, शक्तिशाली, बलाढ्य , तेवढाच अशांत सुद्धा असतो . पृथ्वीवरील अंनत अशा नानाविध संपदा सुविधा मिळाव्यात म्हणून रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो . अनेकदा बर्याच गोष्टी मिळतात काही सुटतात,तर काही मिळाल्यानंतर हातातुन निसटतात असं हा निश्चित अनिश्चितता यांचा खेळ असतो .या मध्ये मन शांती हि चिर स्थायी व सगळ्यात सुलभ बाब आहे . परंतु प्रत्येक मनुष्य याच चिरस्थायी आणि सगळ्यात सुलभ बाब असणार्या मनःशांती पासुन कित्येक कोस दूर आहे तिथपर्यंत पोहचण्यासाठी मनुष्य प्रयत्न जरी करत असला तरी जे मुख्य प्रयत्न आवश्यक आहेत ते न करता दुसरेच प्रयत्न करत असल्याने हि मन शांती बाह्य अशा भौतिक जगात मध्ये मिळणं दुर्लभ आहे .
आपल्या जीवनात चिर शांती नको असा कोणी हि शोधून सापडणार नाही .शांती साठी मनुष्य जग भ्रमण करतो. कुठलाही उपाय पर्याय मनुष्य शिल्लक सोडत नाही . परंतु वास्तविक सत्य हे आहे कि शांती हि बाह्य जगात सापडणारी किंवा कुठल्याही मुल्यावर विकत मिळणारी बाब नाही . तर ती आपल्या चित्ता मधील आंतरीक प्रकिया आहे . शांती हि आपल्या अंतःकरणात असते म्हणून जर चित्त अशुद्ध असेल तर कुठल्याही किंमतीवर शांती मिळणार नाही . आणि जर आपल चित्त हे सुद्धा असेल तर कुठल्याही अटी शर्ती शिवाय अगदी सहजासहजी निःशुल्क मन शांती आपल्यला मिळेल या मध्ये शंका नाही म्हणजेच शांती हि आपल्या चित्ता मध्ये निर्माण होणा-या जो भाव आहे त्यावर अवलंबून असते . आपल्या मनात सुद्धा चित्ताने सदभावना ,सदभाव निर्माण झाले तर मन शांती मिळेलच मात्र असुद्धा चित्त ठेवून दुरभावना , निर्माण झाली तर कितीही प्रयत्न केले तरी मनःशांती मिळु शकत नाही . सुद्धा चित्त आणि सदभावना ठेवणं हेच सांध्याच्या विद्यमान युगातील सगळ्यात मोठी अडचण आहे समस्या आहे तसेच खुप मोठं आव्हान आहे तर मग सुद्धा चित्त कसं ठेवणार आणि मन शांती कशी मिळणार तर हे फार काही अवघड अस कार्य नाही यासाठी आपल्या मनात आणि जीवनात सात्विक वृत्ती निर्माण झाली कि आपोआप हे सगळं जग विष्णू मय दिसत आणि आणि भौतिक मोह माया, लाभ नफा , मित्र, शत्रु एकसमान दिसतात वाईट काहीच दिसत नाही.आणि एकदा वृत्ती सुद्धा झाली कि आपोआप चित्त सुद्धा होत आणि मन शांती मिळते . यासाठी आध्यत्मिक ज्ञान हे सगळ्यात प्रभावी माध्यम या मार्गावर पोहचण्यासाठी . उपयुक्त आहे .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301