दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
साधारणतः पाऊस आल्यानंतर प्रत्येक जणआसरा शोधून उभे राहतात आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा काम सुरू करतात, असा अनुभव असतो. मात्र आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखी बंदोबस्तामध्ये भर पावसात राष्ट्रीय NH६५ या महामार्गावर थांबून महामार्ग पोलिस केंद्र मोडनिंब चे पोलिस अंमलदार केशव सुर्वे यांनी मुसळधार पावसातही आपलं कर्तव्य सुरू ठेवल्याने त्यांचें आज सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांचीशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आपण केवळ आपलं कर्तव्य बजावत होतो,मी या अगोदरही २०१९ साली रायगड कोकण (मानगाव)हायवे बंदोबस्तातही अशाच भर पावसामध्ये कर्तव्य बजावत होतो. मी स्वतःहा माळकरी आहे, पांडूरंगाची सेवा करायला पाऊस काय कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला आम्ही नेहमीच तयार असतो. हे कर्तव्य बजावत असताना माझ्या सोबतीला सहपोलिस निरीक्षक विजय गायकवाड साहेब,पी.आय. मल्लिकार्जुन सोनार साहेब, हवालदार हरिदास माळी, दिनेश हाके, गणेश शिंदे हे पण कर्मचारी भर पावसामध्ये आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते.
या सर्व कर्मचाऱ्यांचे महामार्ग एस. पी.फड मॅडम, डि.वाय.एस.पी.प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक योगेश वेळापुरे व इतर वरीष्ठ अधिकारी यांनी कौतुक केले आहे.
सुर्वे साहेब आपण व आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी भर पावसातही आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावले आहे.या आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपणास दैनिक चालु वार्ता चा सलाम .