दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवर देवी धूम्रपान करताना आणि एलजीबीटीक्यू ध्वज हातात धरलेली दिसत आहे. यामुळे चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई हिला टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान तिने सोमवारी (४ जुलै) सांगितले की, ती जिवंत आहे तोपर्यंत ती निर्भय आहे. तसेच याबद्दल आवाज उठवत राहील.
या सगळ्या दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये लीना मणिमेकलाईच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, प्रार्थनास्थळावरील गुन्हेगारी, हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे, शांतता भंग करण्याच्या हेतू, असे आरोप केले आहेत.