दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : सध्या दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचे मूळ वेतन सुमारे 20 हजार रुपये आहे, ते दरमहा 60 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
आमदारांचे मूळ वेतन 12,000 रुपयांवरून 30,000 रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
एकूणच आमदारांचे वेतन आणि मासिक भत्ते दरमहा 54,000 रुपयांवरून 90,000 रुपये प्रतिमहा होणार आहेत.
सभागृहाचे अध्यक्ष, उपसभापती, मुख्य व्हीप आणि विरोधी पक्षनेते यांच्या पगारातही मंत्र्यांइतकीच वाढ होणार आहे