दैनिक चालु वार्ता सातारा प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांत दिनांक २८ जून रोजी दुपारी श्री. संतश्रेष्ठ माऊलींच्या पालखीचे आगमन सातारा जिल्ह्यांत झाले आणि माऊलींच्या पालखीची जबाबदारी सातारा जिल्हा प्रशांसनावर पडली २८ जुन ते ४ जुलै पर्यंत सातारा जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनांने यांच्यासह जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी माऊलींच्या पालखी बंदोबस्तांत माननीय जिल्हाधिकारी मा. शेखर सिंह अप्पर जिल्हाधिकारी माधवी सर देशमुख, मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी मा. विनय गौडा, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम, मा.अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, वाई विभागांचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. डॉ शितल जानवे खराडे मॅडम यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी अगदी काही पोलिस अधिकारी व काही महिला पोलीस कर्मचारी वारकरी वेशभूषातील जिल्हा वासियांना देव रुपांने विविध पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, महिला पोलिस अधिकारी पाहायला मिळाले. यामध्ये वारकरी वेशभूषा परिधान करुन काही पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांचाही समावेश माऊलींच्या पालखीमध्ये आपली सेवाही पार पाडत. वारकऱ्यांमध्ये चांगलेच रमून गेले होते. यावेळी माऊलींचा सातारा जिल्ह्यांतील शेवटचा मुक्काम म्हणून बरड येथे असतो दुपारचा विसावा हा पिंपरद या ठिकाणी आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे माऊलींचा मुक्काम ता. फलटण बरड ठिकाणी होतो. यावेळी दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी भर पावसांमध्ये माऊलींचे बरड या पालखीतळावर आगमन झाले. यावेळी फलटण विभागांतील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच बरड गावचे सर्व ग्रामस्थ भागांतील राजकीय, सामाजिक मंडळी तसेच फलटण तालुक्यांचे आमदार दीपक चव्हाण साहेब यांच्या वतीने माऊलींचे त्यांच्या मूळगावी ता. फलटण तरडगाव येथेही तसेच बरड मध्येही भव्य स्वागत झाले. एक दिवसीय माऊलींच्या मुक्कामांच्या बंदोबस्तांचे नियोजन बरड दूरक्षेत्रांचे तरुण आणि शिस्तप्रिय अशी आपली जिल्हा पोलीस प्रशांसनामध्ये ओळख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनविणे यांनी माऊलींच्या पालखीसह त्याचबरोबर आलेल्या सर्व वारकऱ्यांवर तसेच भागांतील येणाऱ्या भाविंक भक्तांवर सोनविणे हे स्वता लक्ष देवुन होते. त्यांनी एकदिवसीय माऊलींच्या पालखीचा नियोजित बंदोबस्त व स्वता लक्ष घालून शेवटच्या माऊलींच्या टप्प्यावरील मुक्कामांत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यांच्या या उत्कृंष्ट सेवेबद्दल त्यांचा माननीय पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी विनय गौंडा, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरर्डे, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोडसे आदीं पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिंतीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनविणे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन निरोप देण्यांत आला तर सोलापूर प्रशासनाकडूंन माऊलींचे भव्य स्वागत करण्यांत आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती, तेजस्विनी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मतराव जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक शैक्षणिक, धार्मिक, अन्य मान्यवर मंडळी कडूंन श्री. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे सोलापूर प्रवेश द्वाराजवळ भर पावसांच्या रिमझिम धारेत माऊली, माऊली असा गजर करीत भव्य स्वागत.