दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर:- श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत मोतीराम महाराज संस्थान कलंबर खुर्द तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे दिनांक 10 जुलै 2022. आषाढ शु.11 रविवार. सकाळी 11 वाजता श्री हनुमान मंदिर पासून भाविक भक्तांची पायी दिंडी सोहळा श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान पर्यंत निघणार आहे. दुपारी. 01 वाजता. श्री डॉ.गोविंद नादेडे सर यांचे प्रवचन होणार आहे.या कार्यक्रमास. ह.भ. प.संभाजी महाराज ह.भ. प.बापूराव महाराज. आणि भजनी मंडळ.कलंबर बु. आणि खुर्द.लाठी बु.,लाठी खुर्द,गुंडेवाडी,मोकलेवाडी. भोपळवाडी आणि गावातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थान कडून कळवण्यात आले आहे.दुपारी 3 वाजता महाआरती होईल त्यानंतर. फराळ आणि चहा. देण्यात येणार आहे तरी भाविक भक्तांनी दर्शन घेऊन आपले साह्य द्यावे अशी विनंती संस्थानामार्फत करण्यात आली आहे.