दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- सरडेवाडी तालुका इंदापुर जि. पुणे येथील टोल नाक्यावर आज पर्यंत स्थानीक वाहनांसाठी टोल माफी होती. परंतु दि. १/७/२०२२ पासून स्थानीक वाहन चालकां कडून पण सर्रास टोल वसूली चालू करण्यात आली आहे.त्यामुळे स्थानीक वाहन चालक व टोल कर्मचारी यांच्यातील वादाचे प्रमाण वाढले.त्या निषेधार्त जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर शाखेचे तालुका अध्यक्ष श्री विनोद मखरे यांच्या नेतृत्वात दि.५/७/२०२२ रोजी भव्य आसे आंदोलन करण्यात आले.
त्या वेळी बोलतांना श्री मखरे यांनी प्रशासनास असे सुचीत केले की येत्या शुक्रवार पर्यंत आमच्या लोकलच्या वाहनांना टोल माफी देण्यात यावी. अन्यथा त्या नंतर तीव्र असे आंदोलन करण्यात येईल.
इंदापुर पोलीस स्टेशनचे स.पो.उपनिरीक्षक श्री प्रकाश पवार,पो. ना. श्री जगदीश चौधव हे पोलीस फौज फाट्यासह आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते.
आंदोलना मधे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे अनिल जठार,अंबादास चव्हाण,बाळू हजारे, गणेश डावरे,गणेश कापसे,परमेश्वर मखरे, इमरान शेखसह दिडशेच्यावर वाहनांचा दुतर्फा सहभाग होता.