दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर – देगलूर तालुक्यातील मरखेल येथील प्रशांत शंकरराव देशमुख हे त्यांचा शैक्षणिक पदव्युत्तर विभागाचा पेपर असल्याने मुक्रमाबाद या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी गेले होते. तर त्यांचे आई- वडील हे तिरुपती या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. घरातून बाहेर पडल्याची संधी साधून स्वयंपाक घराचे व मुख्य दरवाजाचे कडी तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले रोख साडेबारा हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने असा ३७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज पळविला. गावातील व्यक्तीने माहिती दिल्यावर प्रशांत देशमुख यांनी घरात येऊन पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पास जमादार बालाजी पुरी, रफिक सय्यद करीत आहेत.