दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: नायगाव तालुक्यातील नरसी येथील ओम मशिनरी या दुकानदाराने ठिबक सिंचन साहित्यावरील अनुदान लाटण्यासाठी खोट्या सह्या करून बिले तयार केल्याचे उघडकीस आल्याने या दुकानाचा वितरकाचा परवाना कृषी विभागाने रद्द केला आहे. या बिलावर जैन इरिगेशन कंपनीच्या इंजिनिअरच्या बोगस सह्या करून प्रस्ताव दाखल केला असा आरोप असून त्यामुळे ओम मशीनरी अॅण्ड हार्डवेअरचा नोंदणी परवाना कृषी विभागाने २० जून रोजी रद्द केला आहे. सदर वितरकाने शेतकरी आणि शासनाची फसवणूक केली असल्याने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड कार्यालयात ६ जून रोजी सुनावणी ठेवली होती. सदर सुनावणीच्या वेळी प्रस्तावावर कंपनी इंजिनिअरची स्वाक्षरी आहे. नसल्याबाबत वितरकाने मान्य केले होते. त्या बिलावर कंपनी इंजिनिअरची मूळ स्वाक्षरी घेऊन तसेच साठा नोंदवही तालुका कृषी अधिकारी यांना सादर करून प्रमाणित करून कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिली होती. परंतु आजपर्यंत मूळ स्वाक्षरीची बिले व साठा नोंदवही सादर केलेलीच नाहीत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या दुकानाचा नोंदणी परवाना रद्द करण्यात आला आहे. जैन इरिगेशनलाही या वितरकास तुषार व ठिबक संचाचे साहित्य पुरवठा करू नये, असे आदेश दिले आहेत. या वितरकाने सिंचन साहित्याचा साठा नसतानाही त्याने जैन इरिगेशनच्या इंजिनिअरच्या बिलावर बोगस सह्या मारून प्रस्ताव सादर केला होता हार्डवेअरची नोंदणी रद्द करण्यात यावी असा अहवाल बिलोली व नायगाव कृषी विभागाच्या वतीने दाखल केले
होता हे विशेष