दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
भंडारा:-स्थानिक सनीज स्प्रिंग डेल शाळेत वन महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल तसेच प्रमुख अतिथी समृद्धी गंगाखेडकर, कल्पना जांगडे होते. प्राचार्य शेफाली पाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना झाडांचे महत्त्व मानवी जीवनात किती मोलाचे असते तसेच वन महोत्सव हा एक असा कालावधी आहे जो वर्षातुन एकदा जूलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात साजरा केला जातो.या वनमहोत्सवात लोकांमध्ये वृक्ष तसेच जंगल यांच्याविषयी जागृकता निर्माण केली जाते.यासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जात असतात.
यादिवशी संपुर्ण जगभरात वृक्षारोपणाची मोहीम राबविली जाते.घरोघरी रोपटे लावली जातात.आणि इतरांना देखील ह्या मोहीमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित तसेच प्रेरित केले जाते.ह्या महोत्सवात जागोजागी वृक्षांची लागवड केली जाते.जंगलाचे संरक्षण करणे किती महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपण जंगलतोडीला रोखणे किती आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी झाड व पर्यावरण यावर एक सुंदर पथनाट्य सादर केले, तसेच “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे “हे गीत गाऊन उपस्थित्यांचे मन जिंकले कार्यक्रमाची सांगता झाल्यावर शाळेतून वृक्ष दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका प्रज्ञा घाटबांधे,प्रिया चौधरी, वैशाली बोन्द्रे, वर्षा रामेकर तसेच रमेश झंझाड यांनी अथक परिश्रम घेतले तर विद्यार्थी अस्मि गेडाम, शुभदा शेंडे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुशाग्रा शर्मा हिने आभार प्रदर्शन केले.