दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-झाडे लावा झाडे जगवा या घोषणेच्या सुरात सामाजिक वनीकरण विभाग भूमच्या वतीने वन महोत्सव अंतर्गत वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीचा शुभारंभ उपविभागीय महसूल अधिकारी रोहिणी न-हे यांच्या शुभहस्ते केला. विद्यार्थ्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने दिंडी काढून घरोघरी वृक्ष लागवडीचा संदेश दिला.
महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाकडून वन महोत्सव साजरा केला जात आहे. 15 जून ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वृक्ष लागवडी संदर्भात वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण अधिकारी बी व्ही सदानंदे यांच्या नेतृत्वाखाली भूम शहराच्या समर्थ नगर . शिवाजी नगर रोड . वारदवाडी रोड . नगरपालिका चौक. वेताळ रोड . लक्ष्मी रोड . गोलाई चौक. ओंकार चौक मार्गे गुरुदेव शाळेत वृक्ष दिंडीचा समारोप केला. या दिंडीमध्ये शहरातील गुरुदेव शाळा. रवींद्र शाळा व सौ राणीतारा राजा प्रशालेतील ११०० विदयार्थ्यानी वृक्ष दिंडि काढून वृक्ष लागवडीचा संदेश दिला. तसेच बेलेश्वर विद्यालय पखरुड व जिल्हा परिषद शाळा पखरुडच्या तबब्ल 400 विद्यार्थ्यांनी देखील वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृतीचा संदेश दिला
बुधवार दिनांक 6/07/2022 रोजी काढलेल्या वृक्ष दिंडीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्री गुरुदेव हायस्कूलच्या प्रांगणात वड . सीताफळ. उंबर अशी वेगवेगळया प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवसे पत्रकार शंकर खामकर . चंद्रमणी गायकवाड . सचिन बारगजे. शाळेचे मुख्याध्यापक . शिक्षक . कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान १५०० शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा. वृक्षा रोपण करा . झाडे जगवा. एक मूल एक झाड . एक कुटुंब एक झाड . रिकाम्या जागेत झाडे लावा. बांधा बांधावर झाडे लावा अशा अनेक प्रकारच्या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
वृक्ष दिडिच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण कर्मचारी वनसेवक जी एस गायकवाड, वनरक्षक के बी आडे. वनपाल एस एस कांबळे यांनी परिश्रम घेतले.