दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधि-दादासो वाक्षे
आटपाडी
आईचे छत्र हरपलेल्या चिमुकलीला आधार देत तिच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी घेत तिच्या शैक्षणिक आयुष्याला हातभार लावण्याचे काम केल्याने अनिता पाटील यांच्या सामाजिक कार्या बाबत अभिनंदन होत आहे.
मानसी ही आटपाडी तालुक्यातील माडगुळे या गावी आपल्या आजोळी राहत असून तिच्या आईचे गेल्या दोन महिन्यांपूर्वी कर्करोगाने निधन झाले आहे.वडील मुबंई मध्ये मोलमजुरी करतात दारूच्या व्यवसनाने त्याने मानसीच्या आईलाही सांभाळले नव्हते.मानसीच्या आईने अनेक ठिकाणी नोकरी करून तिचा सांभाळ केला होता.मात्र नियतीने मानसीच्या आईला कर्करोगाने ग्रासत मृत्यूला कवटाळले.
सध्या मानसी ही आपल्या आजोळी माडगुळे येथे राहत असून ती इयत्ता दुसरीला गेली आहे.आजोळी राहणारे आजी -आजोबा व मामा यांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्याने अनिता पाटील यांनी तिच्या या पुढच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत तिच्या अंकांक्षाला झेप घेण्याचे बळ दिले आहे .
इंजि अनिता पाटील म्हणाल्या की सामाजिक कार्य करत असताना अनेक वेळा मुलींच्या वाट्याला असे आलेले दुःख बघताना मनाला खूप वेदना होतात.याशिवाय समाज म्हणून सामाजिक बांधिलकीची जण ठेवून मानसीच्या शैक्षणिक पालक्तवासह तिच्या या पुढच्या आयुष्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेणार आहे.तिला मुलगी म्हणून नव्हे तर दिवा म्हणून समाजामध्ये मान सन्मान मिळावा यासाठी तिला तिच्या पायावर उभी करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान अनिता पाटील यांनी केलेले कार्य लाख मोलाचे असून सामाजिक बांधिलकीचे भान जोपासून महिला सक्षमीकरण व महिल्या साठी कार्य करत असताना मानसीच्या दातृत्वाची जबाबदारी घेत तिला तिच्या आईच्या मायेची ऊब देणाऱ्या अनिता पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा असून आटपाडी तालुक्यामध्ये त्याचे कौतुक होत आहे.