दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:-दि :- ०५/०७/२०२२ मंगळवार रोजी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल , रुद्धा येथे मराठी गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी उत्स्कुर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी वेग – वेगळी बाल गीतं आणि भावगीते गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय संचालक व संचालिका श्री. कुलदीप हाके व सौ. शिवालिका हाके हे आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थांना प्रोत्साहित करण्यासाठी शुभांगी सुर्यवंशी , ज्योत्स्ना स्वामी , स्नेहा ओझा , वैजनाथ धुळगुंडे , भरत कानवते , शुभम पोले , ऋतिक पोले , राम भोंग , इत्यादींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन भरत कांनवटे यांनी केले तर आभार शाळेच्या प्राचार्या सौ.रुथ चक्रणारायण यांनी मानले. तर केशव तोंडारे , अंगद , भागवत , चंद्रकला काडवादे इत्यादींनी परिश्रम घेतले.