दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
पालघर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मोईज शेख यांनी( दिनांक 5 जुलै ) रोजी वाडा तालुका कार्यालयाला वाडा कार्यकर्त्यांच्या तत्काळ विनंती वरून भेट दिली. कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यालयाच्या सभोलतालचे अतिक्रमण करणारे दीपक काभाडी आणि अधिक कंभारे याना अतिक्रमण 10 दिवसात हटावण्याबाबत चे आदेश दिले. सदर प्रसंगी जिल्ह्याचे सरचिटणीस अदनान धांगे,जिल्हा सचिव अनंता वनगा,तालुका अध्यक्ष दिलीपजी पाटील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते संजय जी भानुशाली,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश बाराठे,तालुका सेवादल अध्यक्ष जगदीश केनी, दीपक सिंगासने,चंद्रकांत पवार,प्रल्हाद सावंत,राजेश रहाणे ही सर्व काँग्रेस प्रेमी मंडळी हजर होती. या प्रसंगी वाडा तालुका काँग्रेस तर्फे वरिष्ठ उपाध्यक्ष मोईज शेख यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करणेत आले.
ज्या वाड्याचे काँग्रेस भवन स्वर्गिय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे, ते काँग्रेस भवन याच्यापुढे जराही विद्रूप केल्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर जिल्हा काँग्रेस कडक कारवाई करील असा इशारा मोईज शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.